15 lakh fraud of woman in wakad वाकड महिलेची १५ लाखांची फसवणूक

0

वाकड: टेलिकॉम डिपार्टमेंटमधील प्रतिनिधी आणि पोलिस असल्याचे भासवून मनी लॉन्ड्रींग झाल्याचे सांगत महिलेची १५ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना वाकड येथे घडली. या प्रकरणी ३४ वर्षीय महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीसह पीएसआय हेमराज कोळी असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे.

अनोळखी व्यक्तीने फिर्यादी महिलेला फोन करून ती टेलिकॉम डिपार्टमेंट ऑफ इंडियामधून बोलत असल्याचे खोटे सांगितले. फिर्यादी यांच्या नावाने सिमकार्ड खरेदी करुन त्याचा वापर मनी लॉन्ड्रींगसाठी केला आहे. फिर्यादीच्या खात्यावरुन २५ कोटींचे व्यवहार झाले असून त्याबाबत मुंबईत गुन्हे दाखल करण्यात आल्याची भीती घातली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *