60 lakh ladaki bahin applications to be rejected 60 लाख लाडक्या बहीणींचे अर्ज बाद होण्याच्या चर्चा

0
60 lakh ladaki bahin applications to be rejected 60 लाख लाडक्या बहीणींचे अर्ज बाद होण्याच्या चर्चा

60 lakh ladaki bahin applications to be rejected 60 लाख लाडक्या बहीणींचे अर्ज बाद होण्याच्या चर्चा

महाराष्ट्रात नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुकिमध्ये २८८ जागांपैकी महायुतीला २३५ जागांवर विजय मिळवता आला , तर महाविकास आघाडीला केवळ ४७ जागांवर समाधान मानावे लागले. निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड यशाचे कारण म्हणजे राज्यातील महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी जुलैच्या मांडलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना.

विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहिण योजनेची रक्कम १५०० रुपयांवरून २१०० रुपये करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र आता या लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी करण्याची तयारी सरकार करत आहे. या छाननीत किमान ६० लाख लाडक्या बहिणींचे अर्ज फेटाळले जाऊ शकतात, असा अंदाज आहे.

खालील निकषांवर लाडकी बहीण योजनेची पडताळणी केली जाणार आहे

  • या योजनेचा आर्थिक लाभ एका घरातील दोन महिलांना दिला जातो
  • ज्यांच्याकडे मोटार वाहन आहे, त्यांना योजेनेचा लाभ घेता येणार नाही. गरिबांना त्याचा लाभ व्हावा, हा या योजनेचा उद्देश आहे.
  • महिलांचे किंवा त्यांच्या कुटुंबियांचे एकत्रित उत्पन्न अडीच लाखरुपयांपेक्षा जास्त असले तरी त्यांच्या अर्जांची छाननी केली जाणार आहे.
  • या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची छाननी केली जाणार आहे. त्यांच्या घरी चारचाकी वाहन असल्यास त्यांच्या अर्जांचीही पडताळणी केली जाणार आहे .
  • एकाच महिलेने दोन अर्ज दाखल केले असतील तर त्यांच्या अर्जांचीही छाननी केली जाणार आहे.
  • लग्नानंतर महाराष्ट्रातून इतर राज्यात स्थलांतरित झालेल्या पण तरीही या योजनेचा लाभ येथे घेणाऱ्या महिला आहेत. जर महिलेने अर्ज केला असेल आणि लाभ घेत असेल तर तिच्या अर्जांची पडताळणी केली जाईल.
  • आधार कार्डवरील नाव आणि इतर कागदपत्रांमध्ये काही तफावत आढळल्यास त्याचीही पडताळणी केली जाणार आहे.
  • या योजनेचा लाभ घेणारी महिला इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असेल तर तिच्या अर्जांचीही पडताळणी केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *