Deadline for Vehicle Preference Number till Monday वाहन पसंतीक्रमांकाची सोमवारपर्यंत मुदत

Deadline for Vehicle Preference Number till Monday वाहन पसंतीक्रमांकाची सोमवारपर्यंत मुदत

Deadline for Vehicle Preference Number till Monday वाहन पसंतीक्रमांकाची सोमवारपर्यंत मुदत

पिंपरी : वाहन क्रमांकाची ‘एमसी’ मालिका सुरू होणार आहे. त्यातील आकर्षक क्रमांक नोंदणीसाठी ३० डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) केले आहे. आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी अर्ज करावा लागणार आहे.

हा अर्ज आणि धनाकर्ष (डीडी) ३० डिसेंबर रोजी सकाळी अकरा ते दुपारी अडीच दरम्यान कार्यालयात द्यायचा आहे. त्यासोबत पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रती जमा करायच्या आहेत. एकाच क्रमांकाकरिता जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्धी केली जाणार आहे.

या यादीतील अर्जदारांनी लिलावासाठी जास्त रक्कमेचा एकच डीडी ३१ डिसेंबररोजी दुपारी अडीच वाजेपर्यंत सीलबंद लिफाफ्यात कार्यालयात जमा करायचा आहे.

You may have missed