Launch of Tobacco-Free School Campaign at Kudalwadi School कुदळवाडी शाळेत तंबाखू मुक्त शाळा अभियानाची सुरूवात

Launch of Tobacco-Free School Campaign at Kudalwadi School कुदळवाडी शाळेत तंबाखू मुक्त शाळा अभियानाची सुरूवात
प्रज्ञादिप सोशल फाऊंडेशन आणि गोल्डन लेटर्स बाल विकास फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिकेच्या कुदळवाडी प्राथमिक शाळा क्र. ८९ मध्ये तंबाखू मुक्त शाळा अभियानाची सुरूवात करण्यात आली. या अभियानाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक संपत पोटघन आणि डॉ. प्रकाश रोकडे यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमात गोल्डन लेटर्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. राणी खेडीकर, तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे मानसशास्त्रज्ञ हनमंत हाडे, उपाध्यक्षा वैशाली गायकवाड, खजिनदार प्रज्ञा रोकडे आणि २३८ विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
डॉ. प्रकाश रोकडे यांनी तंबाखूजन्य धुम्रपानाचे दुष्परिणाम आणि व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व सांगितले. हनमंत हाडे यांनी उपस्थितांना तंबाखू मुक्त होण्याची शपथ दिली.
तंबाखू मुक्त शाळा अभियानामुळे पिंपरी चिंचवड परिसरातील शाळांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांविषयी जागरूकता निर्माण केली जाईल, असे डॉ. प्रकाश रोकडे यांनी सांगितले.