Cancer Awareness Walkathon in talegaon tabhade तळेगाव दाभाडेच्यावतीने कर्करोग वॉकेथॉन आयोजित

Over 150 Citizens Participate in Cancer Awareness Walkathon in talegaon tabhade तळेगाव दाभाडेच्यावतीने कर्करोग वॉकेथॉन आयोजित
तळेगाव दाभाडे, जागतिक कर्करोग दिनानिमित्त, इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्यावतीने रविवारी (ता. २) तळेगाव दाभाडे येथे ‘कॅन्सर वॉकेथॉन’चे आयोजन करण्यात आले. कर्करोगाच्या जनजागृतीसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन डिस्ट्रिक्टचे अध्यक्ष डॉ. शोभना पालेकर आणि तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपमुख्याधिकारी ममता राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.
दीडशेहून अधिक नागरिकांनी कर्करोगाबद्दल जनजागृती फलक हाती घेत वॉकेथॉनमध्ये सहभाग घेतला. महिलांना गर्भाशयाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळवण्यासाठी शासनाद्वारे दिल्या जाणाऱ्या एचपीव्ही लसीकरणाबाबतही माहिती देण्यात आली. त्याचबरोबर, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छ भारत अभियानाची शपथ घेण्यात आली.
कार्यक्रमात इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा प्रवीण साठे यांनी स्वागत केले, तर प्रकल्प प्रमुख डॉ. दीपाली झंवर यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुणे म्हणून तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक संजय घोगरे उपस्थित होते. डॉ. शाळिग्राम भंडारी यांनी उपक्रमाचे कौतुक केले. क्लबच्या सचिव ज्योती देशपांडे, शलाका वालिया, अर्चना मुरुगकर यांच्यासह मेधाविन फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशाली दाभाडे, सचिव निशा पवार आणि सदस्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.