Young Man Attacks Person with a Knife for Not Giving a Cigarette सिगारेट न दिल्याने तरुणाने कोयत्याने केले वार

पिंपळे गुरव, मंगळवारी (ता. ४) रात्री साडेसात वाजता पिंपळे गुरव येथील सृष्टी चौकात एका व्यक्तीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला. रंगनाथ जगदीश गुत्तेदार (वय ४०, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, संतोष धुळे जाधव (वय २८, रा. पिंपळे गुरव) याने सिगारेट न दिल्यामुळे त्यांच्यावर कोयत्याने वार केला. या प्रकरणी संतोष जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.