Pimpri-Chinchwad Gets the Country’s Most Modern Police Commissionerate पिंपरी-चिंचवडला मिळाले देशातील अत्याधुनिक पोलीस आयुक्तालय

0
Pimpri-Chinchwad Gets the Country's Most Modern Police Commissionerate पिंपरी-चिंचवडला मिळाले देशातील अत्याधुनिक पोलीस आयुक्तालय

Pimpri-Chinchwad Gets the Country's Most Modern Police Commissionerate पिंपरी-चिंचवडला मिळाले देशातील अत्याधुनिक पोलीस आयुक्तालय

भूमिपूजन सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती

पिंपरी चिंचवड, मुंबई नंतर पुणे हे देशातील सर्वात मोठे पोलीस आयुक्तालय होते. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने याचे विभाजन करणे आवश्यक होते, म्हणून पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची निर्मिती करण्यात आली. देशातील सर्वात आधुनिक पोलीस आयुक्तालय पिंपरी-चिंचवडला मिळाले आहे. राज्याच्या पोलीस गृहनिर्माण विभागाने खासगी व्यावसायिकांना मागे टाकत अशा इमारती उभारल्या आहेत. आयुक्तालयाच्या इमारतीचे काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. प्रत्येक इमारत ५० वर्षांचा विचार करून उभारली जात आहे, ज्याचा नागरिकांना मिळणाऱ्या सेवेवर चांगला परिणाम होईल, असे ते म्हणाले.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अत्याधुनिक इमारतीचे भूमिपूजन तसेच महापालिकेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गृह राज्यमंत्री योगेश कदम, आमदार महेश लांडगे, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, महापालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची अत्याधुनिक इमारत जाधववाडी, चिखली येथे ३.३९ हेक्टर जागेत उभारली जाणार आहे. देहूरोड पोलीस ठाण्याच्या परिसरात पोलिसांसाठी गेस्ट हाऊस उभारले जाणार आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याची इमारत चाकण इंडस्ट्रियल असोसिएशनच्या सीएसआर फंडातून १८.६६ कोटी रुपये खर्चून उभारली जाणार आहे. याशिवाय पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मध्यवर्ती अग्निशमन केंद्रासह विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी प्रास्ताविक केले, तर आभार अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed