Vehicle Vandalism in Chikhli Incident Occurs Just Two Days After Ajit Pawar’s Instruction चिखलीत वाहनांची तोडफोड अजित पवार यांच्या सूचनांनंतर दोनच दिवसांत घडली घटना

0
Vehicle Vandalism in Chikhli Incident Occurs Just Two Days After Ajit Pawar's Instruction चिखलीत वाहनांची तोडफोड अजित पवार यांच्या सूचनांनंतर दोनच दिवसांत घडली घटना

Vehicle Vandalism in Chikhli Incident Occurs Just Two Days After Ajit Pawar's Instruction चिखलीत वाहनांची तोडफोड अजित पवार यांच्या सूचनांनंतर दोनच दिवसांत घडली घटना

चिखलीत वाहनांची तोडफोड; अजित पवार यांच्या सूचनांनंतर दोनच दिवसांत घटना घडली

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाहनांची तोडफोड करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करून त्यांची धिंड काढण्याच्या सूचन दिल्या होत्या. मात्र, त्यानंतर दोनच दिवसांत चिखली परिसरात रविवारी (ता. ९) पहाटे वाहनांची तोडफोड झाली. यामध्ये एकूण १२ वाहने फोडण्यात आली. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
चिखलीतील जाधववाडी येथे पोलिस आयुक्तालयाची इमारत साकारली जात आहे. त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संघटित गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पुणे व पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांना दिले होते. या बैठकीत सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पवार यांनी वाहनांची तोडफोड करणाऱ्या गुन्हेगारांवर ‘मकोका’ (संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यांनी स्पष्ट केले होते की पोलिसांच्या कारवाईत कोणताही राजकीय हस्तक्षेप राहणार नाही. कायद्यापुढे कुणीही मोठा नसल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस यांनी अशा गुन्हेगारांना अटक केल्यानंतर त्यांची धिंड काढून लोकांना कायदा किती श्रेष्ठ आहे, हे दाखविण्याचे आवाहन केले होते.

पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाहनांची तोडफोड
या सूचनांच्या दोनच दिवसांनी, चिखली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जाधववाडी परिसरात वाहनांची तोडफोड झाली. हे ठिकाण भूमिपूजन कार्यक्रमाच्या ठिकाणापासून अवघ्या ३ किलोमीटर अंतरावर होते. या तोडफोडीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले
चिखलीतील मोरे वस्ती येथील महापालिका शाळेच्या परिसरात उभ्या केलेल्या १२ वाहनांची तोडफोड केल्याच्या प्रकरणात एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस निरीक्षक अमोल फडतरे यांनी या बाबत माहिती दिली. तोडफोड केलेल्या वाहनांमध्ये टेम्पो, मोटारी यांसारखी वाहने समाविष्ट आहेत, असे चिखली पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed