pimpri chinchwad Municipal Corporation’s Standing Committee Approves Various Development Projects पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीत विविध विकासकामांस मंजुरी

0
pimpri chinchwad Municipal Corporation's Standing Committee Approves Various Development Projects पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीत विविध विकासकामांस मंजुरी

pimpri chinchwad Municipal Corporation's Standing Committee Approves Various Development Projects पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीत विविध विकासकामांस मंजुरी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत मंगळवारी (दि. ११) शहरातील विविध विकासकामांसाठी मंजुरी देण्यात आली. आयुक्त आणि प्रशासक शेखर सिंह यांनी ड्रेनेजलाइन, स्टॉर्म वॉटर लाईन टाकणे, रस्त्याचे डांबरीकरण आदींसह अनेक महत्त्वाच्या कामांना मंजुरी दिली. चन्होली व कासारवाडी मैलाशुध्दीकरण केंद्रांतर्गत चिखली, मोशी, ९ नेहरूनगर, अजमेरा सोसायटी आणि इतर परिसरात ड्रेनेजलाइन आणि मॅनहोल चेंबरचे दुरुस्ती केली जाणार आहेत. इंद्रायणीनगर सेक्टर १ ते १३ मध्ये लांडगे नगर, गवळीमाथा, खंडेवस्ती, बालाजीनगर आणि इतर ठिकाणी ड्रेनेजलाईनमध्ये सुधारणा केली जाणार आहे. वाकड, ताथवडे परिसरात पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी लाईन टाकण्यात येणार आहे. बोपखेल येथील विविध ठिकाणी रस्त्यांचे डांबरीकरण, एमआयडीसी व इतर परिसरातही रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. चिखलीतील मोरेवस्ती, चिंचेचा मळा परिसरात नवीन स्टॉर्म वॉटर लाईन टाकण्यात येईल. शेलारवस्ती परिसरातील रस्ते तसेच औद्योगिक परिसरातील रस्ते डांबरीकरणासाठी मंजुरी देण्यात आली आहे. चिखलीतील नवीन जलशुध्दीकरण केंद्र ते इंद्रायणी नदीपर्यंत नाला बांधण्याचीही मंजुरी देण्यात आली आहे. कुदळवाडी परिसरात रस्त्याचे डांबरीकरण तसेच चिंचवड येथील नवीन तालेरा रूग्णालयात ऑपरेशन थिएटरकरिता बेड खरेदी व मेडिकल गॅस पाईपलाइन टाकण्यासही मंजुरी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed