Free Bus Pass Applications for Disabled and 60+ Blind Individuals Now Open दिव्यांग आणि ६० वर्षांवरील अंधांसाठी मोफत बसपास अर्ज प्रक्रिया सुरु

Free Bus Pass Applications for Disabled and 60+ Blind Individuals Now Open दिव्यांग आणि ६० वर्षांवरील अंधांसाठी मोफत बसपास अर्ज प्रक्रिया सुरु
पिंपरी चिंचवड महापालिकेने दिव्यांग आणि ६० वर्षांवरील अंध व्यक्तीच्या सोबतीस असलेल्या व्यक्तीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या मोफत बसपासची सुविधा सुरू केली आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी अर्ज प्रक्रिया गुरुवारी (ता. १४) पासून ऑनलाइन सुरू झाली आहे. अर्ज ३१ मार्चपर्यंत स्वीकारले जातील.
महापालिकेच्या दिव्यांग कल्याणकारी योजनेतर्गत २०२५-२६ आर्थिक वर्षासाठी पात्र लाभार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. सर्व नागरी सुविधा केंद्रांमध्ये ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकृती उपलब्ध करण्यात आलेली आहे.
जुन्या पासधारकांनी त्यांच्याकडील जुने मोफत बसपास पिंपरीतील नारायण मेघाजी लोखंडे कामगार भवन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी जमा करावे.