Grand Conclusion of MLA Laxmanbhau Cup Cricket Tournament, Winners Awarded Prizes स्व. आमदार लक्ष्मणभाऊ चषक क्रिकेट स्पर्धेचा भव्य समारंभ, विजेत्यांना पारितोषिके वितरण

0
Grand Conclusion of MLA Laxmanbhau Cup Cricket Tournament, Winners Awarded Prizes स्व. आमदार लक्ष्मणभाऊ चषक क्रिकेट स्पर्धेचा भव्य समारंभ, विजेत्यांना पारितोषिके वितरण

Grand Conclusion of MLA Laxmanbhau Cup Cricket Tournament, Winners Awarded Prizes स्व. आमदार लक्ष्मणभाऊ चषक क्रिकेट स्पर्धेचा भव्य समारंभ, विजेत्यांना पारितोषिके वितरण

स्व. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या ६२ व्या जयंतीनिमित्त आयोजित आमदार लक्ष्मणभाऊ चषक भव्य क्रिकेट स्पर्धा पिंपरी चिंचवडमध्ये अत्यंत उत्साहात आणि शिस्तप्रिय वातावरणात पार पडली. या स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा केंद्रीय राज्यमंत्री मा. श्री. मुरलीधर अण्णा मोहोळ आणि विधानपरिषदेचे सन्माननीय सभापती मा. श्री. राम शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

स्पर्धा ०७ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आली, ज्यात पिंपरी चिंचवड क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ३२ संघ, पुणे जिल्ह्यातील १६ संघ, आणि सांगवी, दापोडी, पिंपळे गुरव येथील २० स्थानिक संघांसह एकूण ८४ संघांनी सहभाग घेतला. प्रत्येक संघातील खेळाडूंनी उत्कृष्ट क्रीडाशैलीचे प्रदर्शन करत स्पर्धेला रोमांचक बनवले.

बक्षिस वितरण कार्यक्रमात विजेत्या संघांना रोख रक्कम आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. पराभूत संघांना पुढील कारकिर्दीसाठी नव्या जोमाने तयारी करण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी श्री. अजय दुधभाते, श्री. मनीष कुलकर्णी, श्री. निलेश जगताप आणि श्री. प्रविण वाघमोडे यांचे अभिनंदन करण्यात आले.

आमदार श्री. अमित गोरखे, भाजपाचे मावळचे अध्यक्ष श्री. रवींद्र भेगडे, प्रसिद्ध उद्योजक श्री. विजय जगताप, महापौर सौ. माई ढोरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

विजेत्या संघांची यादी:

PATCA अंतर्गत विजयी संघ:

  • प्रथम क्रमांक: अमर भाऊ काटे स्पोर्ट फाउंडेशन (आधी श्री इलेव्हन)
  • द्वितीय क्रमांक: रायझिंग स्टार भोसरी
  • तृतीय क्रमांक: सह्याद्री योद्धा दिघी
  • चतुर्थ क्रमांक: संडे क्रिकेट क्लब कासरवाडी

सांगवी पिंपळे गुरव दोपोडी प्रीमियर लीग विजयी संघ:

  • प्रथम क्रमांक: MNC
  • द्वितीय क्रमांक: सक्सेस ग्रुप
  • तृतीय क्रमांक: संदीप दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन
  • चतुर्थ क्रमांक: राहुल जवळकर स्पोर्ट्स फाउंडेशन
  • पाचवा क्रमांक: संजय कणसे ब्रिलियंट बॉईज

खुल्या गटातील विजेते:

  • प्रथम क्रमांक: कोथरूड स्ट्रायकर कोथरूड
  • द्वितीय क्रमांक: मातोश्री 11 हडपसर
  • तृतीय क्रमांक: श्री विठ्ठल नाना काटे स्पोर्ट्स फाउंडेशन खेड
  • चतुर्थ क्रमांक: आलम भाई पठाण क्रिकेट क्लब खडकवासला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed