“MLA at Your Doorstep” Initiative in Chinchwad Constituency, Resolution of Citizens’ Issues चिंचवड विधानसभा क्षेत्रात “आमदार आपल्या दारी” उपक्रम, नागरिकांच्या समस्यांचे निराकरण

"MLA at Your Doorstep" Initiative in Chinchwad Constituency, Resolution of Citizens' Issues चिंचवड विधानसभा क्षेत्रात "आमदार आपल्या दारी" उपक्रम, नागरिकांच्या समस्यांचे निराकरण
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण व पाठपुरावा करण्यासाठी “आमदार आपल्या दारी” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. आज प्रभाग क्रमांक २२, काळेवाडी परिसरात महापालिका आणि शासकीय अधिकाऱ्यांसमवेत नागरिकांच्या समस्या ऐकण्यात आल्या. या समस्यांचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना आमदार शंकर जगताप यांच्याकडून देण्यात आल्या.
नागरिकांनी मुलभूत सुविधांशी संबंधित अनेक मुद्दे मांडले, जसे की रस्ते, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता, सार्वजनिक वाहतूक आणि सुरक्षेची बाब. याशिवाय शासकीय योजनांची अंमलबजावणीसंबंधी अनेक सूचना देण्यात आल्या. या सर्व समस्यांवर सकारात्मक पाऊले उचलण्याचे आश्वासन आमदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
आमदारांनी पुढे असेही सांगितले की, काळेवाडी परिसर अधिक सक्षम, सुंदर आणि सुखकर बनवण्यासाठी त्यांचे प्रयत्न कायम राहतील.
या उपक्रमाला नगरसेविका सौ. नीताताई पाडाळे, सौ. उषा माई काळे, श्री. प्रमोद ताम्हणकर, श्री. विनोद नढे, श्री. सुरेश नढे, सौ. ज्योतीताई भारती, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री. काळूराम नढे, व अन्य मान्यवर तसेच महापालिका आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते.