Swarsri Music Festival to be Held on 22nd and 23rd February स्वरश्री संगीत महोत्सव २२ आणि २३ फेब्रुवारीला

Swarsri Music Festival to be Held on 22nd and 23rd February स्वरश्री संगीत महोत्सव २२ आणि २३ फेब्रुवारीला
स्वरश्री फाउंडेशनच्या वतीने २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी स्वरश्री संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव औंध येथील पंडित भीमसेन जोशी कला मंदिर येथे सायंकाळी चार वाजता होईल. यंदाचा स्वरश्री पुरस्कार ज्येष्ठ गायक शिवदास देगलूरकर यांना आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सतारवादक उ. उस्मान खाँ यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाची रुपरेषा:
- २२ फेब्रुवारी:
- नामदेव शिंदे यांचे शास्त्रीय गायन
- अंजली शिंगडे – राव यांचे व्हायोलिन वादन
- उस्ताद अर्षद अली यांचे शास्त्रीय गायन
- २३ फेब्रुवारी:
- आरती ठाकूर यांचे शास्त्रीय गायन
- विवेक सोनार यांचे बासरी वादन
- पं. श्रीनिवास जोशी यांचे शास्त्रीय गायन
साथसंगत:
- संवादिनी: उदय कुलकर्णी, गंगाधर शिंदे, अमेय बिच्चू
- तबला: प्रशांत पांडव, पं. समीर सूर्यवंशी, किशोर कोरडे, गणेश तानवडे, निलेश रणदिवे, कार्तिक स्वामी
- पखवाज: गंभीर महाराज
- टाळ: शिवाजी डाके, मकरंद बादरायणी
कार्यक्रमाचे निवेदन नामदेव तळपे आणि आकाश थिटे करणार आहेत.