New WhatsApp Scam Targets Water Bill Payments in Pimpri-Chinchwad पाणी बिलाच्या बहाण्याने व्हॉट्सअपवरून सायबर फसवणूक

0
New WhatsApp Scam Targets Water Bill Payments in Pimpri-Chinchwad पाणी बिलाच्या बहाण्याने व्हॉट्सअपवरून सायबर फसवणूक

New WhatsApp Scam Targets Water Bill Payments in Pimpri-Chinchwad पाणी बिलाच्या बहाण्याने व्हॉट्सअपवरून सायबर फसवणूक

 पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नावाखाली सायबर फसवणुकीचा नवीन प्रकार उघडकीस आला असून, यामध्ये एका ७६ वर्षीय वृद्ध व्यक्तीला २,६५,५०९ रुपये फसवून घेण्यात आले. फसवणूक करणाऱ्यांनी पाण्याच्या बिलाच्या अपडेटच्या बहाण्याने व्हॉट्सअपवरून मॅसेज पाठवून, त्याद्वारे बनावट सॉफ्टवेअर (Pipeline water update.apk) इन्स्टॉल करून पैसे काढून घेतले.

या प्रकरणी फिर्यादी श्री. रतनलाल मुरलीधर शर्मा (वय ७६) यांनी १९ फेब्रुवारी २०२५ रोजी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, त्यांना मोबाईल नंबर ८०१७०५६६१९ वरून एक मॅसेज प्राप्त झाला, ज्यामध्ये त्यांचे पाणी बिल अपडेट नसल्याने पाणी कनेक्शन कापले जाण्याची भीती घालण्यात आली होती. मॅसेजमध्ये त्यांना तात्काळ अधिकारी श्री. दिवेश जोशी (मो. नं. ९८७५६४७५९९) यांच्याशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले होते.

त्यानंतर, आरोपींनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या नावाखाली संपर्क करून, त्यांना व्हॉट्सअप नंबर ८१०१५७६९५४ वरून एक मॅसेज पाठवला. या मॅसेजमध्ये “Pipeline water update.apk” नावाची फाईल पाठवण्यात आली होती. फिर्यादीला ती फाईल डाऊनलोड करण्यास भाग पाडण्यात आले, ज्यामुळे त्यांच्या बँक खात्यातून एकूण २,६५,५०९.६६ रुपये काढून घेण्यात आले.

पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४१९, आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६, ६६(सी), ६६(डी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक बळीप (पोउपनि) यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे.

पोलिसांनी नागरिकांना सूचना दिली आहे की, अशा प्रकारच्या संदिग्ध मॅसेज किंवा फाईल्सवर विश्वास ठेवू नये आणि कोणत्याही संशयास्पद कृतीबद्दल त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed