MLA Mahesh Landge Supports Anti-Encroachment Drive in Kudalwadi-Chikhali, But Opposes Damage to Small Entrepreneurs इंद्रायणी नदी प्रदूषण आणि अवैध धंद्यांवर कारवाईचे आमदार लांडगे यांनी केले समर्थन, सरसकट कारवाईचे विरोध

0

चिखली, महापालिका प्रशासनाने कुदळवाडी-चिखली परिसरात अतिक्रमणांच्या विरोधात कारवाई केली आहे. इंद्रायणी नदी प्रदूषण, शहर आणि देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर अवैध भंगार व्यावसायिक आणि बेकायदेशीर कार्यवाहीचे आम्ही समर्थन करतो. तथापि, सरसकट कारवाईमुळे लघु उद्योजक आणि भूमिपुत्रांचे मोठे नुकसान झाले आहे. हे आम्ही कदापि समर्थन करणार नाही, अशी भूमिका आमदार महेश लांडगे यांनी मांडली आहे.

या कारवाईमुळे रस्ते आणि महापालिकेच्या आरक्षण असलेल्या मोठ्या क्षेत्रांतील अतिक्रमणं हटविण्यात आली आहेत. लांडगे म्हणाले, “कुदळवाडी-चिखली परिसरातील अनधिकृत भंगार व्यावसायिक आणि अवैध धंद्यांवर कारवाई केली गेली पाहिजे, कारण ते इंद्रायणी नदी प्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, अवैध धंदे, वाढती गुन्हेगारी, वाहतूक कोंडी आणि आगीच्या घटनांकरिता कारणीभूत ठरत आहेत. यासाठी घेतलेल्या कारवाईसाठी आम्ही मुख्यमंत्री आणि प्रशासनाचे आभार मानतो.”

अशा कारवायांमुळे लघु उद्योग आणि भूमिपुत्रांचे नुकसान झाले आहे, जे आम्ही स्वीकारू शकत नाही. आम्ही महापालिका प्रशासन आणि राज्य सरकारकडे या बाबत दाद मागणार आहोत, असे लांडगे यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed