Ajit Pawar’s suggestion of strict action on Koyta gang and crime in Pune पुण्यातील कोयता गँग आणि गुन्हेगारीवर अजित पवार यांची कडक कारवाईची सूचना

0
Ajit Pawar's suggestion of strict action on Koyta gang and crime in Pune पुण्यातील कोयता गँग आणि गुन्हेगारीवर अजित पवार यांची कडक कारवाईची सूचना

Ajit Pawar's suggestion of strict action on Koyta gang and crime in Pune पुण्यातील कोयता गँग आणि गुन्हेगारीवर अजित पवार यांची कडक कारवाईची सूचना

चिखली, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील वाढती गुन्हेगारी आणि विशेषत: “कोयता गँग”च्या गुन्ह्यांवर पोलिसांना कडक आदेश दिले आहेत. त्यांनी पोलिसांना अशा गुन्हेगारांवर त्वरित कारवाई करण्याची सूचना दिली आणि त्यांच्या धिंडी काढण्याचे निर्देश दिले. चिखलीतील जाधववाडी परिसरात पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय इमारतीच्या भूमिपूजन समारंभात बोलताना पवार म्हणाले की, पुण्यातील बिबवेवाडी आणि येरवड्यात झालेल्या वाहन तोडफोडीच्या घटनांवर पोलिसांनी त्वरित कारवाई करायला हवी. “कोयता गँग कुठून येते? त्यांचा बंदोबस्त करा, मोक्का लावा, काय करायचं ते करा,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

पवार यांनी पोलीस कार्यप्रणालीवरही आपली नाराजी व्यक्त केली आणि पुण्यातील घडलेल्या घटनांवर लक्ष ठेवण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. “पोलिसांना सर्व मुभा आहे. पोलिसांसाठी आम्ही अत्याधुनिक इमारती उभारत आहोत, वाहने देत आहोत आणि आवश्यक साधनसामग्री पुरवली जात आहे. पोलिसांनी गुन्हेगारी थांबवली पाहिजे,” असे पवार म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “अशा गुन्हेगारी घटकांवर कठोर कारवाई केली पाहिजे. आरोपींना पकडल्यानंतर त्यांची धिंड काढा. यामुळे सर्वांना कळलं पाहिजे की कायदा किती श्रेष्ठ आहे. हे लक्षात ठेवा, कोण मोठ्या बापाचा किंवा छोट्या बापाचा नाही.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed