Amol Kolhe Demands Detailed Report on Action Against Illegal Constructions in Kudalwadi कुदळवाडीतील अतिक्रमण कारवाईवर डॉ. अमोल कोल्हे यांची सविस्तर अहवाल मागणी

Amol Kolhe Demands Detailed Report on Action Against Illegal Constructions in Kudalwadi कुदळवाडीतील अतिक्रमण कारवाईवर डॉ. अमोल कोल्हे यांची सविस्तर अहवाल मागणी
चिखली, ५ मार्च २०२५ – चिखली कुदळवाडी भागातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांवर महापालिकेने सुरू केलेली कारवाई सध्या चर्चेचा विषय बनली आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे सविस्तर अहवाल मागितला आहे. यामध्ये त्यांनी या कारवाईतून करण्यात आलेली करवसुली आणि त्यानंतर होणारा लघुउद्योगांवर होणारा परिणाम या संदर्भात माहिती मागितली आहे.
डॉ. कोल्हे यांनी महापालिकेला दिलेल्या निवेदनात, “२०२५ पर्यंत महापालिकेने कारवाई केलेल्या भागातील लोकांकडून किती कर गोळा केला आहे? त्यांना पावत्या दिल्या का? अनधिकृत बांधकामांसाठी कर कसा वसूल केला?” अशी गंभीर प्रश्न उपस्थित केली. त्याचप्रमाणे, त्या भागातील स्थानिक ग्रामपंचायतीकडून किती वेळा कर भरणा करण्यात आला आणि प्रशासनाने कसा कारवाई केली याबद्दल देखील माहिती मागवली आहे.
विशेष म्हणजे, या कारवाईमुळे ५०० हून अधिक लघुउद्योगांचे नुकसान झाल्याची तक्रार आहे. डॉ. कोल्हे यांनी प्रशासनाच्या चुकीमुळे उध्वस्त झालेले लघुउद्योग व त्यासंबंधी नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
महापालिका प्रशासनाने संबंधित लोकांना ‘अनधिकृत’ बांधकामाच्या बाबतीत पूर्वसूचना दिली होती का? त्यावर कार्यवाही करण्यात आली होती का? या मुद्द्यांवर डॉ. कोल्हे यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं महापालिकेकडून मिळवणे आवश्यक आहे.
संपूर्ण कारवाईच्या संदर्भात आगामी टीपी स्कीमवरही चर्चा सुरू असून, याबाबत डॉ. कोल्हे यांनी सविस्तर माहिती मिळवून द्यावी, अशी मागणी केली आहे.