Ban on entry of heavy vehicles in Pune city from today पुणे शहरात आजपासून अवजड वाहनांना प्रवेश बंदी

Ban on entry of heavy vehicles in Pune city from today पुणे शहरात आजपासून अवजड वाहनांना प्रवेश बंदी

Ban on entry of heavy vehicles in Pune city from today पुणे शहरात आजपासून अवजड वाहनांना प्रवेश बंदी

Ban on entry of heavy vehicles in Pune city from today शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी मंगळवारपासून (५ मार्च) बाहेरून येणाऱ्या अवजड वाहनांना पुणे शहरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. पुण्याबाहेरून मुंबई, सोलापूर, अहमदनगर, साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी केले आहे.

 चिंचवडमधून मेंढपाळाचे अपहरण, बीडमधून दिलासा

शहरात मेट्रो मार्गासह अनेक विकासकामे सुरू आहेत. विविध कामांमुळे वाहतुकीचा वेग कमालीचा मंदावला आहे. वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना त्रास होत आहे. त्यामुळे पुणे शहरात अवजड वाहनांवर बंदी असणार आहे, हा निर्णय मंगळवारपासून लागू होणार आहे.

विकसित राष्ट्राच्या परिवर्तनाच्या प्रवासात प्रत्येक पदवीधराची भूमिका महत्त्वाची – राज्यपाल

पिंपरी-चिंचवड, मुंबई, सातारा, सोलापूर या शहरांतून पुण्याकडे येणाऱ्या अवजड वाहनांना हे निर्बंध लागू होणार आहेत. वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुण्याबाहेर जाणाऱ्या अवजड वाहनांना शहरात प्रवेश दिला जाणार नाही. पुणे-नगर, पुणे-सोलापूर, पिंपरी चिंचवड शहरातील प्रमुख रस्त्यांवर अवजड वाहनांना पूर्ण बंदी असेल. वाघोलीकडून पुण्याकडे येणाऱ्या अवजड वाहनांना नगर रोडवर २४ तास प्रवेश बंद राहणार आहे.जड वाहनांनी शिक्रापूरहून चाकणमार्गे पिंपरी-चिंचवड, तळेगाव दाभाडेमार्गे मुंबईकडे जावे. शहराकडे जाणाऱ्या अवजड वाहनांनी थेऊर फाटा मार्गे लोणीकंद, शिक्रापूरमार्गे त्यांच्या इच्छित स्थळी जावे.

मावळ, शिरूर, बारामतीच्या निवडणूक रिटर्निंग अधिकाऱ्यांना पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना