Chandrakant Patil informed about Pune Metro

Chandrakant Patil informed about Pune Metro
Chandrakant Patil informed about Pune Metro
Chandrakant Patil informed about Pune Metro

Chandrakant Patil informed about Pune Metro 1ऑगस्ट पुणे, पुणेकरांनी आजपासून सुरू होणाऱ्या मेट्रोच्या निम्मी मेट्रोच्या पुणे मेट्रोच्या विस्तारित मार्गिकांचा प्राधान्याने वापर करावा असं आवाहन पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्याचे वेळापत्रक

काय म्हणाले चंद्रकांत पाटील
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मेट्रोच्या विस्तारित मार्गांचा उद्घाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी मेट्रोच्या शिवाजीनगर भूमिगत स्थानकावर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले आता पहिला टप्पा सुरू झाला त्यामध्ये सुरुवातीला खूप वर्दळ असायची पण नंतर नंतर असं लक्षात आलं की प्रवास म्हणून प्रत्यक्ष उपयोगी ज्याला आपण म्हणू की प्रत्यक्ष प्रवास म्हणून उपयोगी टप्पा झाला नव्हता. त्यामुळे तो थोडा एन्जॉयमेंट चा भाग झाला होता. हा टप्पा मात्र लोकांच्या प्रवासाला उपयोगी टप्पा आहे. त्यामुळे मला लोकांना असं आवाहन आहे त्यांनी आता शक्यतो आपल्या वाहनांना रस्त्यावर न आणता मेट्रो ने प्रवास केला पाहिजे. त्यामुळे आपला वेळही वाचेल इंधनही वाचेल. इतक्या मोठ्या प्रमाणात गाड्या वापरल्यामुळे पर्यावरणाला ही धोका आहे तोही वाचेल.
तिसरा टप्पा ज्यावेळेस सुरू होईल त्याला थोडा वेळ लागणार आहे. त्यावेळेस पूर्ण शहराची खरी गरज पूर्ण होईल. हा उद्याचा टप्पा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याला हिरवा झेंडा दाखवणार आहेत आणि तो हिरवा झेंडा दाखवल्यावर दोन तासातच लोकांचे प्रवास सुरू होतील. नॉर्मली अशा उद्घाटनाला उद्घाटन होतं आणि वापर सुरू व्हायला एक आठवडा निघून जातो. मेट्रोने तयारी त्याची इतकी ठेवली आहे की तिकडे झेंडा दाखवत असताना दोन्ही ट्रेनमधून प्रवासी प्रवास करतील नंतर कोणीही या रूट वर प्रवास करायला सुरुवात करू शकतो त्यामुळे सर्वांना आवाहन आहे कि खासगी वाहना ऐवजी मेट्रोचा वापर करावा.