Delay in E-KYC Process at Fair Price Shops in Pimpri Chinchwad, Causing Confusion Among Citizens पिंपरी चिंचवडमधील स्वस्त धान्य दुकानांमध्ये ई-केवायसी प्रक्रियेत विलंब, नागरिकांमध्ये गोंधळ

0

पिंपरी चिंचवडमधील स्वस्त धान्य दुकानांमध्ये सध्या शिधापत्रिका धारकांच्या ई-केवायसी प्रक्रियेत विलंब होत आहे. यामुळे दुकानधारक आणि रेशनकार्ड धारकांमध्ये वादावादीचे प्रसंग उभे राहत आहेत.राज्य सरकारने रेशनकार्ड धारकांसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक केले आहे. यासाठी गेल्या काही महिन्यांमध्ये दोन ते तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे.

सध्या ही प्रक्रिया ३१ मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. अन्नधान्य वितरण व पुरवठा कार्यालयाने नागरिकांना ३१ मार्च २०२५ पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. शहरात एकूण ३,१३,००० शिधापत्रिका धारक आहेत, तर २४८ स्वस्त धान्य दुकाने आहेत. या दुकानदारांनी आणि त्यांचे कुटुंबीयांनी ई-केवायसी पूर्ण केली नाही, तर त्यांची नावे रेशनकार्डमधून कमी केली जाऊ शकतात आणि त्यांना धान्य मिळणे बंद होऊ शकते.

त्याचप्रमाणे, परराज्यातून नोकरी किंवा व्यवसायासाठी पिंपरी चिंचवडमध्ये आलेल्या नागरिकांना ई-केवायसी करत असताना सर्व्हर डाऊन होणे, इंटरनेटमध्ये अडथळे निर्माण होणे, आणि ई-पॉस मशीन बंद पडणे यासारख्या अडचणी येत आहेत.ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या ई-केवायसी प्रक्रियेत देखील अडचणी निर्माण होत आहेत. ६० ते ६५ वयाच्या नागरिकांच्या अंगठ्यांच्या ठसा अस्पष्ट होऊन त्यांचे ई-केवायसी पूर्ण होत नाही. याशिवाय, लहान मुलांचे आधारकार्ड अपडेट केलेले नसल्यास त्यांच्याही ई-केवायसीमध्ये अडथळे येत आहेत. नागरिकांना त्यांचे आधारकार्ड अपडेट करून मोबाईल क्रमांक लिंक करणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed