Electricity dispute in Indiranagar, Dalvinagar इंदिरानगर, दळवीनगरात वीजपुरवठा वारंवार खंडित

Electricity dispute in Indiranagar, Dalvinagar इंदिरानगर, दळवीनगरात वीजपुरवठा वारंवार खंडित
चिंचवड : प्रेमलोक पार्क, इंदिरानगर, दळवीनगर या परिसरात गुरुवारी रात्रभर वीजपुरवठा खंडित होता. असे प्रकार वारंवार घडत आहेत. या समस्येमुळे नागरिक हैराण असून, यातून अनेक घरगुती उपकरणे खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः सिंगल फेज पुरवठ्यामुळे अधिक अडचणी येत आहेत. स्थानिक नागरिकांच्या मते खंडित वीजपुरवठ्याची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यात महावितरण अपयशी ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून वीज खंडित होण्याचे जवळपास नित्याचेच झाले आहे. बिजलीनगर विभागाला दूरध्वनी केला असता कोणीही तो उचलत नसल्याच्याही तक्रारी आहेत. केवळ तांत्रिक दोषांमुळे नाही तर देखभालीच्या अभावामुळेही वीज खंडित होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.