Fire broke out in two houses in Pune, 2 people injured पुण्यात दोन ठिकाणी आग, दोन जण जखमी

Fire broke out in two houses in Pune, 2 people injured पुण्यात दोन ठिकाणी आग, दोन जण जखमी

Fire broke out in two houses in Pune, 2 people injured पुण्यात दोन ठिकाणी आग, दोन जण जखमी

Fire broke out in two houses in Pune, 2 people injured पुण्यातील मुंढवा आणि उंड्री भागात आगीच्या दोन घटना घडल्या असून दोन जण जखमी झाले आहेत. मुंढवा येथील बंगल्याच्या स्वयंपाकघराला आग, आई-मुलगा जखमी. मुंढवा येथील झगडे पार्क परिसरातील संकल्प बंगल्याला दुपारी भीषण आग लागली. या आगीत अंजली ईश्वर सकट (वय 58) आणि त्यांचा मुलगा जतीन (वय 32) हे जखमी झाले. बंगल्याला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले.

मावळ लोकसभा मतदारसंघात दहशत : 9 ठिकाणी नाकाबंदी, 50 लाखांची रोकड जप्त

किचनमध्ये गॅस सिलिंडरला गळती लागली होती. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवानांनी तातडीने प्रयत्न सुरू केले. आगीत स्वयंपाकघरातील साहित्य जळून खाक झाले. आगीत अंजली आणि तिचा मुलगा जतीन जखमी झाले. जवानांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनवणे, शौकत शेख तांडेल रणदिवे, जगताप, बिचकुले, कवडे, कांबळे यांनी आग आटोक्यात आणली.

 बनावट ताडी बनवणाऱ्या 2 जणांना अटक, रसायनाचा साठा जप्त

दुसरी घटना बुधवारी सकाळी ८ च्या सुमारास उंड्री येथील होल वस्ती परिसरात घडली. तेथील एका रद्दीच्या दुकानाला आग लागली. आगीत भंगार वस्तू जळून खाक झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. अग्निशमन अधिकारी कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दहा कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली. घोरपडीचे बी. टी. कवडे रस्त्यावरील सोलेस पार्क सोसायटीच्या रोहित्राला आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली.

शिवसेनेच्या 17 उमेदवारांची घोषणा उद्धव, जाणून घ्या कोणाला मिळणार तिकीट?