Panic in Maval Lok Sabha constituency: 9 places cordoned off, Rs 50 lakh cash seized मावळ लोकसभा मतदारसंघात दहशत : 9 ठिकाणी नाकाबंदी, 50 लाखांची रोकड जप्त

0
Panic in Maval Lok Sabha constituency 9 places cordoned off Rs 50 lakh cash seized मावळ लोकसभा मतदारसंघात दहशत : 9 ठिकाणी नाकाबंदी, 50 लाखांची रोकड जप्त

Panic in Maval Lok Sabha constituency 9 places cordoned off Rs 50 lakh cash seized मावळ लोकसभा मतदारसंघात दहशत : 9 ठिकाणी नाकाबंदी, 50 लाखांची रोकड जप्त

Panic in Maval Lok Sabha constituency: 9 places cordoned off, Rs 50 lakh cash seized पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने एकूण नऊ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील उर्से टोलनाक्यावर नाकाबंदी दरम्यान वाहनांची तपासणी करणारे शिरगाव पोलीस ठाण्याचे पीएसआय शेख व त्यांच्या पथकाने महिंद्रा कंपनीच्या स्कॉर्पिओ वाहनाची तपासणी केली असता त्यांना ५० लाखांची रोकड आढळून आली. सदर रक्कम शिरगाव पोलीस ठाण्यामार्फत जप्त करण्यात आली असून पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

बनावट ताडी बनवणाऱ्या 2 जणांना अटक, रसायनाचा साठा जप्त

निवडणूक आयोग, पोलीस आणि आयकर विभागाचे अधिकारीही या प्रकरणाची चौकशी करत आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत महायुती आणि महाविकास आघाडीने अद्याप अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली नाही. प्रचाराला सुरुवातही झालेली नाही. पुन्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याने मावळ लोकसभा मतदारसंघात खळबळ उडाली आहे. अखेर ही रोकड कोणाची आणि कोणाला देण्यासाठी घेतली जात होती? या दिशेने कनेक्शन जोडले जात आहे.

शिवसेनेच्या 17 उमेदवारांची घोषणा उद्धव, जाणून घ्या कोणाला मिळणार तिकीट?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *