Joint Action to Demolish Unauthorized Constructions in Chikhali चिखलीतील अनधिकृत बांधकामांवर मोठी कारवाई

0
Joint Action to Demolish Unauthorized Constructions in Chikhali चिखलीतील अनधिकृत बांधकामांवर मोठी कारवाई

Joint Action to Demolish Unauthorized Constructions in Chikhali चिखलीतील अनधिकृत बांधकामांवर मोठी कारवाई

चिखली, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पोलिस आयुक्तालय यांच्या संयुक्त कारवाईत चिखली येथील कुदळवाडी भागातील ९६ एकर भूभागावर असलेली सुमारे ४१ लाख चौरस फूट क्षेत्रफळावरील ८०६ अनधिकृत बांधकामे मंगळवारी (ता. ११) पाडण्यात आली. ही कारवाई सलग चार दिवसांपासून सुरू असून, आतापर्यंत १६१ लाख चौरस फूट क्षेत्रफळावरील २ हजार ३१७ बांधकामे भुईसपाट करण्यात आली आहेत.

महापालिकेच्या बांधकाम परवानगी, अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग आणि धडक कारवाई पथकांच्या मदतीने कुदळवाडी येथे शनिवारी (ता. ८) पासून ही कारवाई सुरू करण्यात आली होती. या कारवाईत अनधिकृत पत्राशेड, कारखाने, गोदामे, भंगार दुकाने आणि अन्य अनधिकृत बांधकामांचा समावेश आहे.

पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे आणि महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ही संयुक्त कारवाई सुरू आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे सह पोलिस आयुक्त शशिकांत महावरकर आणि अतिरिक्त पोलिस आयुक्त वसंत परदेशी यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे, डॉ. शिवाजी पवार, संदीप डोईफोडे, विवेक पाटील यांच्यासह इतर पोलिस अधिकारी देखील या कारवाईमध्ये सहभागी झाले आहेत.

आतापर्यंत सुमारे ३७२ एकर भूभागावर ही कारवाई करण्यात आली असून, यापुढेही ही कारवाई सुरूच राहणार आहे.

या कारवाईमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिका, पोलिस आयुक्तालय, महाराष्ट्र सुरक्षा दल, महावितरण कंपनी तसेच अन्य संबंधित यंत्रणांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कारवाईमध्ये १६ पोकलेन, ८ जेसीबी, १ क्रेन, ४ कटर, ३ अग्निशमन वाहने आणि २ रुग्णवाहिका वापरण्यात आल्या. १८० महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान, ६०० पोलिस, मजूर आणि कर्मचारी कारवाईमध्ये सहभागी झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed