Mahaarogya Camp in Akurdi आकुर्डीत महाआरोग्य शिबिर

0
Mahaarogya Camp in Akurdi आकुर्डीत महाआरोग्य शिबिर

Mahaarogya Camp in Akurdi आकुर्डीत महाआरोग्य शिबिर

आकुर्डी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (ता. ८) महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी दहा वाजता सुरू होऊन सायंकाळी चार वाजेपर्यंत चालणार आहे. खंडोबा माळ येथील खंडोबा सांस्कृतिक भवनात हे शिबिर होईल, ज्यात विविध आरोग्य तपासण्या आणि निदान करण्यात येईल.

शिबिरात नोंदणी केल्यानंतर गरजू व्यक्तींना श्रवण यंत्र विनामूल्य दिले जातील. या शिबिराचे संयोजन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने आणि श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल काळभोर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed