Maratha Chamber of Commerce Holds Meeting with Pimpri-Chinchwad Municipal Corporation, Opposes Blanket Encroachment Drive मराठा चेंबर ऑफ कॉमर्सने पिंपरी-चिंचवड महापालिकेशी बैठक घेऊन अतिक्रमण कारवाईच्या विरोधात मांडली भूमिका

0

उद्योग क्षेत्रातील आघाडीची संस्था, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनासोबत महत्त्वाची बैठक आयोजित केली. या बैठकीत महापालिका अधिकारी, पदाधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी आमदार महेश लांडगे, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष श्री. दीपक करंदीकर, महापालिका उपायुक्त श्री. मनोज लोणकर, तसेच क आणि फ क्षेत्रीय अधिकारी श्री. अजिंक्य येळे आणि श्री. श्रीकांत कोळप यांच्यासह श्री. प्रकाश गुप्ता आणि श्री. गोरख भोरे उपस्थित होते.

बैठकीत, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सने स्पष्ट केले की, शहरातील कुदळवाडीप्रमाणे सरसकट अतिक्रमण कारवाई केल्यास लघुउद्योजक आणि भूमिपुत्रांना नाहक त्रास होईल. प्रशासनाने अशी भूमिका घेतल्यास उद्योग क्षेत्रासाठी सकारात्मक वातावरण निर्माण होणं शक्य होणार नाही. त्यासाठी महापालिका प्रशासनाने लघुउद्योजकांना त्रास न देण्याची कृती घेतली पाहिजे.

बैठकीत म्हटले गेले की, पिंपरी-चिंचवड शहरातील उद्योग, विशेषत: कारखानदारी आणि लघुउद्योग हा शहराच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचा घटक आहे. यासाठी, उद्योग आणि उद्योजकांच्या पुनर्वसनासाठी लवकरच एक “ॲक्शन प्लॅन” तयार केला जाईल. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार, शहरातील लघुउद्योजकांवर अतिक्रमण कारवाई होणार नाही, असे अधिकारी संघटनांचे पदाधिकारी यावेळी सांगितले.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचे एकत्रित प्रयत्न उद्योग क्षेत्रासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी महत्वाचे ठरतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed