NCP pays tribute to Savitribai Phule राष्ट्रवादीच्या वतीने सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
खराळवाडी, कठीण परिस्थितीत स्त्री शिक्षण किती गरजेचे व महत्वाचे आहे हा संदेश पोहचविण्याकरिता सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. काही क्रूर रूढींना सामोरे जात सावित्रीबाईंनी आपले पती ज्योतीराव फुले यांच्या सहकार्याने मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यांच्या सन्मानार्थ ३ जानेवारी हा दिवस बालिका दिन म्हणूनही साजरा केला जातो. त्यांच्या कार्यामुळे सावित्रीबाई फुले या केवळ व्यक्ती नसून त्या एक विचारधारा आहेत, असे प्रतिपादन माजी महापौर व राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खराळवाडी येथील कार्यालयात पक्षाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्ताने शहराध्यक्ष योगेश बहल तसेच महिला अध्यक्षा प्रा.कविता आल्हाट शहरातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन तसेच पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बहल बोलत होते. यावेळी प्रा. कविता आल्हाट यांनी देखील मनोगत व्यक्त केले.
यावेळी शिक्षण मंडळाचे माजी सभापती विजय लोखंडे, युवक अध्यक्ष शेखर काटे, विद्यार्थी अध्यक्ष चेतन दुधाळ, प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, महिला वरिष्ठ कार्याध्यक्ष कविता खराडे, व्हीजेएनटी सेल अध्यक्षा निर्मला माने, सुप्रिया सोळांकुरे, शहर उपाध्यक्ष तुकाराम बजबळकर, माऊली मोरे, शहर चिटणीस राजेंद्र म्हेत्रे, महेश ताकवले, धनाजी तांबे, सुनिल आडागळे इत्यादी मान्यवरांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.