New Housing Projects in Dapodi and Sangvi to Get Adequate Water Supply दापोडी व सांगवीतील नव्या गृहप्रकल्पांना मिळणार पुरेसा पाणीपुरवठा

New Housing Projects in Dapodi and Sangvi to Get Adequate Water Supply दापोडी व सांगवीतील नव्या गृहप्रकल्पांना मिळणार पुरेसा पाणीपुरवठा
पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडी आणि सांगवी परिसरासह दापोडी ते निगडी मार्गावरील नव्या गृहप्रकल्पांसाठी पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी महापालिकेच्या वतीने भूमिगत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामाची सुरुवात निगडी, सेक्टर क्रमांक २३ येथून झाली आहे.
यासाठी जलवाहिनी १,000 मिलिमीटर व्यासाची असणार आहे, तर अंतर्गत जलवाहिनी 600 मिलिमीटर व्यासाची असेल. हे काम टप्या-टप्याने केले जाईल, जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही, असे अधिकार्यांनी सांगितले. जलशुद्धीकरण केंद्रापासून संत बसवेश्वर महाराज पुतळ्यापर्यंत या कामाचा विस्तार आहे.
निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापासून सर्व्हिस रस्त्याने जलवाहिनी बीआरटी मार्गात टाकली जाईल. यामुळे बीआरटी मार्ग काही काळ बंद राहील. या जलवाहिनीतून दापोडी येथील पाण्याच्या टाकीपर्यंत पाणी पोहोचवले जाईल.
पिंपरी-चिंचवड शहराच्या शेवटच्या टोकातील दापोडी, सांगवी, आणि फुगेवाडी भागांना पुरेसे पाणी मिळेल. या कामामुळे या परिसरांतील लोकवस्तीला पाणी मिळणार असून, घरप्रकल्पांना पुरेसे पाणी मिळवण्यासाठी महापालिका ही जलवाहिनी टाकत आहे.
या भूमिगत जलवाहिनीच्या प्रकल्पासाठी ५२ कोटी ४२ लाख ३ हजार ७५१ रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. कामाची मुदत दीड वर्ष असून, त्यानंतर दापोडी आणि सांगवी भागांतील गृहप्रकल्पांसाठी पाणी पुरवठा सुरळीत होईल.