Over 250 Structures Demolished on Nashik Highway in Ongoing Anti-Encroachment Drive नाशिक महामार्गावर २५० अतिक्रमण जमीनदोस्त, कारवाई तिसऱ्या दिवशी पूर्ण

0

Over 250 Structures Demolished on Nashik Highway in Ongoing Anti-Encroachment Drive नाशिक महामार्गावर २५० अतिक्रमण जमीनदोस्त, कारवाई तिसऱ्या दिवशी पूर्ण

कासारवाडी ५ मार्च २०२५ – पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरालगतच्या वाहतूक कोंडीला कंट्रोल करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि इतर संबंधित विभागांनी एक मोठी कारवाई सुरु केली आहे. नाशिक महामार्गावर होणाऱ्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत होती, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिक्रमण हटवण्याचा धडाका सुरु करण्यात आला आहे.

या कारवाईत दुसऱ्या दिवशी ४५० आणि तिसऱ्या दिवशी (५ मार्च) २५० बांधकामे जमीनदोस्त केली गेली आहेत. पीएमआरडीए, पुणे महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच स्थानिक पोलीस विभाग यांच्यासह इतर संबंधित विभागांनी एकत्रितपणे ही कारवाई केली आहे.

नाशिक महामार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या अनधिकृत दुकाने, गाळे, टपऱ्या आणि बांधकामे ३० दिवसांच्या आत हटवली जाणार आहेत. सोमवारी (३ मार्च) कारवाई सुरू झाली, त्यानंतर मंगळवारी ४५० बांधकामे हटवली गेली, तर बुधवारी आणखी सव्वादोनशे बांधकामे जमीनदोस्त केली गेली.

या कारवाईमध्ये कच्चे बांधकाम, पत्र्याचे गोदाम, सुरक्षा भिंत, टपऱ्या व पत्राशेड इत्यादी हटवण्यात आले. एकूण ४५ हजार ३०० चौरस फूट रस्ता मोकळा करण्यात आला. पीएमआरडीएने संबंधित नागरिकांना आवाहन केले आहे की, महामार्ग आणि राज्य मार्गालगतच्या अतिक्रमित दुकाने, गाळे आणि बांधकामे त्यांनी स्वतःहून काढून घ्यावीत.

या कारवाईमुळे वाहतूक कोंडीमध्ये घट होण्याची शक्यता आहे आणि तसेच रस्त्याच्या दुरुस्तीची प्रक्रिया सुरळीत होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed