PavanaThadi Fair 2025: Exhibition of Women Self-Help Groups’ Products and Various Activities पवना थडी जत्रा: महिला बचत गटांचे उत्पादने आणि विविध उपक्रमांचे प्रदर्शन

PavanaThadi Fair 2025: Exhibition of Women Self-Help Groups' Products and Various Activities पवना थडी जत्रा: महिला बचत गटांचे उत्पादने आणि विविध उपक्रमांचे प्रदर्शन
सांगवी, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दरवर्षी महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने पवनाथडी जत्रेचे आयोजन केले जाते. यात महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना उत्तम बाजारपेठ उपलब्ध करणे आणि विपणन तसेच विक्री कौशल्य विकसित करणे हे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यासाठी सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर २१ ते २४ फेब्रुवारी दरम्यान पवना थडी जत्रा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिली.
पवना थडी जत्रेच्या नियोजनासाठी महापालिका भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात एक आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला विविध महापालिका अधिकारी आणि कार्यकारी मंडळाच्या सदस्यांनी उपस्थिती दर्शवली.
पवना थडी जत्रेत महिला बचत गटांचे स्टॉल्स, खाद्य पदार्थ, खेळणी आणि विविध वस्तूंचे प्रदर्शन तसेच अन्य उपक्रम आयोजित केले जातील. समाज विकास विभागामार्फत बचत गटांना विविध माध्यमांतून अर्ज मागवण्यात आले असून, त्यानुसार योग्य पद्धतीने स्टॉल्सचे नियोजन करण्यात येणार आहे.
आधिकारिकांच्या सूचनांनुसार जत्रेतील सुरक्षात्मक उपाययोजना सुनिश्चित करण्यात येतील. पिण्याचे पाणी, स्वच्छता, वैद्यकीय पथक, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन, सीसीटीव्ही आणि फिरती शौचालयांची व्यवस्था केली जाईल.
जत्रेत महिलांसह दिव्यांग, तृतीयपंथी बचत गटांचे स्टॉल्स, खादी ग्रामोद्योग महामंडळाची दालनं, सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक कला, मनोरंजनाचे विविध कार्यक्रम आणि उमेद जागर उपक्रमांची माहिती उपलब्ध होईल.