Pimpri-Chinchwad Municipal Corporation’s crackdown on unauthorized constructions in Chikhli continues पिंपरी-चिंचवड महापालिकेची चिखलीत अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरूच

0
Pimpri-Chinchwad Municipal Corporation's crackdown on unauthorized constructions in Chikhli continues पिंपरी-चिंचवड महापालिकेची चिखलीत अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरूच

Pimpri-Chinchwad Municipal Corporation's crackdown on unauthorized constructions in Chikhli continues पिंपरी-चिंचवड महापालिकेची चिखलीत अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरूच

पिंपरी-चिंचवड महापालिकेने चिखलीतील कुदळवाडी-जाधववाडी भागात शनिवारीपासून अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे. बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग आणि विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या पथकांमार्फत ही कारवाई केली जात आहे. रविवारी सलग दुसऱ्या दिवशी, आरक्षित जागा आणि विकास आराखड्यातील रस्त्यांवर उभारलेले अनधिकृत पत्राशेड, कारखाने, गोदामे, भंगार दुकाने आणि इतर अनधिकृत बांधकामं पाडली गेली.

दोन दिवसांच्या कारवाईत सुमारे ६८ लाख ७८ हजार चौरस फूट क्षेत्रावरील ६०७ बांधकामांचा समावेश आहे. एकूण ८२९ बांधकामे पाडली गेली आहेत. यासाठी महापालिकेने अंतर्गत आणि प्रमुख रस्ते बंद केले होते, त्यामुळे वाहनचालकांना किमान दोन ते तीन किलोमीटर वळसा घालून जावे लागले.

महापालिकेच्या अतिक्रमण धडक कारवाई पथकात चार कार्यकारी अभियंते, १६ उपअभियंते, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे १८० जवान, ६०० पोलिस आणि मजूर कर्मचारी सहभागी झाले. याशिवाय, १६ पोकलेन, आठ बुलडोझर, एक क्रेन आणि चार कटर यंत्रांचा वापर करण्यात आला. तसेच, अग्निशमन दलाची तीन वाहने आणि दोन रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या.

महापालिकेच्या या कारवाईत आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम, उपायुक्त मनोज लोणकर, क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे, कार्यकारी अभियंता सुनील बागवानी, पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे, आणि डॉ. शिवाजी पवार यांच्यासह संबंधित अधिकारी प्रत्यक्ष कारवाईच्या ठिकाणी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed