Pimpri Chinchwad Police Commissionerate got 15 acres of land in Wakad पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला वाकडमध्ये 15 एकर जागा मिळाली

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालया Pimpri Chinchwad Police Commissionerat

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालया Pimpri Chinchwad Police Commissionerat

Pimpri Chinchwad Police Commissionerate got 15 acres of land in Wakad महाराष्ट्र शासनाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी वाकड पेठ क्रमांक 39 मध्ये 15 एकर जागा देण्यास मान्यता दिली आहे. या ठिकाणी पोलीस आयुक्त कार्यालय, इतर कार्यालये, कवायत मैदान, क्रीडांगण व निवासस्थाने बांधण्यात येणार आहेत. अशी माहिती एसीपी व जनसंपर्क अधिकारी सतीश माने यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

मार्चपासून दहावी बोर्डाची परीक्षा सुरू होत आहे… विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत

पुणे पोलीस आयुक्तालयातील नऊ पोलीस ठाणी आणि पुणे ग्रामीण हद्दीतील पाच पोलीस ठाणी एकत्र करून पिंपरी चिंचवड आणि परिसरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन करण्यात आले. 15 ऑगस्ट 2018 रोजी आयुक्तालय सुरू झाले. पोलिस आयुक्तालयासाठी योग्य जागा नसल्याने पोलिस आयुक्त कार्यालय, पोलिस मुख्यालय, अधिकाऱ्यांची निवासस्थाने, परेड ग्राऊंड, क्रीडांगण आजतागायत उपलब्ध झालेले नाही.

मावळसह शिंदे शिवसेनेच्या 6 जागांवर भाजपचा दावा

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेच्या इमारतीत सध्याचे पोलिस आयुक्तांचे कार्यालय भाड्याने सुरू आहे. पोलिस आयुक्तालयासाठी ही जागा अपुरी पडत आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस आयुक्तालयासाठी स्वतंत्र जागेसाठी शासनस्तरावर सातत्याने लॉबिंग केले. यासाठी शहरातील लोकप्रतिनिधींनीही सहकार्य केले.

वक्त वक्त की बात… फडणवीस यांनी शरद पवारांचे जेवणाचे निमंत्रण नाकारले

या प्रयत्नांना यश आले असून पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या वाकड पेठ क्रमांक 39 येथील 15 एकर जागा पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड यांना सध्याच्या व्यावसायिक दरानुसार देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. हे ठिकाण काळेवाडी फाट्याजवळ असून हे ठिकाण मध्यवर्ती, प्रशासकीय आणि नागरिकांसाठी सोयीचे असेल. या ठिकाणी लवकरच सुसज्ज पोलीस आयुक्त कार्यालय आणि इतर कार्यालये उभारण्यात येणार आहेत.

उपायुक्त विवेक पाटील, सहायक आयुक्त डॉ.मुगळीकर, विठ्ठल कुबडे यांची बदली