Pimpri Municipal Commissioner launches ‘Cycle to Work Thursday’ initiative पिंपरी महापालिका आयुक्तांच्या हस्ते ‘सायकल टू वर्क गुरूवार’ उपक्रमाचा शुभारंभ
Pimpri Municipal Commissioner launches ‘Cycle to Work Thursday’ initiative शहरातील रस्त्यांवर दुचाकी व चारचाकी वाहनांची वाढती संख्या आणि प्रदूषण व तापमानात होणारी वाढ पाहता याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. यासाठी पिंपरी चिंचवड पालिकेने दर गुरुवारी सायकलिंग टू वर्क म्हणजेच ‘सायकल टू वर्क गुरूवार’ सुरू केली आहे. आपले मत व्यक्त करताना आयुक्त शेखर सिंह म्हणाले की, नागरिकांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा असून लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने हा उपक्रम अधिक व्यापक होण्यास मदत होऊ शकते.
महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणाऱ्या दोन भावांना अटक
सायकल टू वर्क गुरुवार उपक्रमाचा शुभारंभ आज सकाळी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत करण्यात आला. आयुक्त शेखर सिंह यांनी स्वत: या उपक्रमात सहभागी होऊन त्यांच्या निवासस्थानापासून कार्यालयापर्यंत सायकलने प्रवास केला, तर इतर अधिकारी व कर्मचारीही आज सायकलवरून कार्यालयात आले. त्यात सहायक आयुक्त यशवंत डांगे, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, उपअभियंता सुनील पवार, कनिष्ठ अभियंता सुनील बेळगावकर, संतोष कुडले, संगणक परिचालक अनंत चुटके यांच्यासह कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
महाशिवरात्री उत्सवानिमित्त पुणे, पिंपरी चिंचवड ते भीमाशंकर जाण्यासाठी अधिक बस सुविधा
शहरातील प्रदूषण, वाहनांची वाढती संख्या, शहरी तापमानात झालेली वाढ आदी समस्या सोडविण्यासाठी पालिकेकडून विविध उपाययोजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच या उपक्रमांमध्ये नागरिकांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा असून प्रत्येकाने वैयक्तिक पुढाकार घेऊन या उपक्रमांना हातभार लावणे आवश्यक आहे. आयुक्त शेखर सिंह यांनीही यावेळी सांगितले की, सायकल टू वर्क गुरूवार या उपक्रमात प्रत्येक गुरुवारी महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणेच सायकलचा वापर करून नागरिकही आरोग्यदायी व पर्यावरणपूरक भविष्याकडे वाटचाल करू शकतात व युवा पिढीला या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकते.
ड्रग्ज प्रकरणः बिहारमधून गर्लफ्रेंडला अटक, मुख्य आरोपी धुनिया कुवेतला फरार