purple jallosh 2025 दिव्यांगांचा महाउत्सव
चिंचवड, उद्या, शुक्रवार(१७ जानेवारी २०२५) पासून सुरु होणाऱ्या ‘पर्पल जल्लोष’ दिव्यांगांचा महाउत्सव या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, पिंपरी चिंचवडचे सहाय्यक पोलीस आयुक्त बापू बांगर, महानगरपालिकेचे माहिती व जनसंपर्क विभागाचे उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड आदींनी कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. यावेळी मा.आयुक्तांनी आवश्यक त्या सूचना आयोजक व प्रशासनाला दिल्या.
मोशी, भोसरी आणि रावेत येथील तीन जागा ‘पीएमआरडीए’ कडून ‘पीएमपी’ला हस्तांतरित
या कार्यक्रमाचे निमंत्रण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी थेट निगडी येथील सुहद मंडळ पुणे संचलित चिंचवड बधिर मूक विद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना दिले. विद्यार्थ्यांनी देखील आनंदाने हे निमंत्रण स्वीकारले.
या कार्यक्रमाच्या जय्यत तयारीसाठी सहभागी झालेल्या स्वयंसेवकांना द गुड टॉक फॅक्टरी संस्थेचे रघु दत्त यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी यशस्वीतेसाठी एस. बी. पाटील इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट, निगडी व एम. एम. पॉलिटेक्निक थेरगाव /काळेवाडी येथील विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून सहभागी झालेले आहेत.
चिंचवडमध्ये जुगारात हारल्याने, बहिणीचे 9 लाखांचे दागिने चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक