Ration Shopkeepers in Chikhli Take Initiative for Distribution of Ayushman Bharat Cards चिखलीत आयुष्मान भारत कार्ड वितरणासाठी रास्त भाव धान्य दुकानदारांचा पुढाकार

केंद्र शासनाच्या आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आरोग्य कार्ड काढण्यासाठी शहरातील २४८ रास्त भाव धान्य दुकानदारांनी पुढाकार घेतला आहे. या योजनेची सुरुवात रविवार (ता. ९) पासून झाली आहे आणि पुढील १५ दिवसांत आयुष्मान कार्ड वितरीत केले जातील. यासाठी आशा सेविकांची मदत घेतली जात आहे.
धान्य दुकानदारांकडून शिधापत्रिकाधारकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले जात आहे. या योजनेअंतर्गत गरजू व्यक्तींना आयुष्मान कार्ड काढून घ्यावे लागते. या कार्डाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना वर्षाकाठी पाच लाख रुपयांपर्यंत उपचार घेता येतात. या योजनेत देशभरातील २९ हजारांहून जास्त रुग्णालयांमध्ये नागरिक कॅशलेस व पेपरलेस आरोग्य सुविधांचा लाभ घेऊ शकतात.
शहरातील रास्त भाव धान्य दुकानदारांनी योजनेचे कार्ड नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आशा सेविकांच्या माध्यमातून हे कार्ड नागरिकांना दिले जात आहेत. दुकानदारांनी शिधापत्रिकाधारकांशी संपर्क साधून प्रत्येक कुटुंबातील सदस्याचे आधारकार्ड तपासून त्यांना हे कार्ड दिले जात आहे.