separated wife stabbed husband in chikhali चिखलीत विभक्त राहणाऱ्या पत्नीवर चाकूने वार

0

चिखली, परिसरातील मोरेवस्ती येथील विजय एकता कॉलनीत पतीपासून विभक्त झालेल्या महिलेवर पतीने धारदार शस्त्राने वार केल्याची घटना बुधवारी(दि.१५) घडली. याप्रकरणी त्यांच्या २३ वर्षीय पत्नीने चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिचा पती अंचल ललितकुमार मिश्रा (रा. पिरानगर, ता. कुंडा, जि. प्रतापगड, उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी महापौर तात्या कदम यांचे निधन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी पती-पत्नी आहेत. त्याच्यामध्ये भांडण झाल्याने संतापलेल्या आरोपी आंचलने घटनेच्या दिवशी पत्नी राहत असलेल्या ठिकाणी गेला. तेथे त्याने तिला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. घरातून भाजी कापणाऱ्या चाकूने तिच्या गळ्यावर आणि गालावर वार करण्यात आले. यात पत्नीच्या गळ्याला, गालाला आणि हनुवटीला मार लागल्याने ती गंभीर जखमी झाली. चिखली पोलिस तपास करीत आहेत.

मेडिकल दुकानातील रोख रकमेची चोरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *