Six Injured in Leopard Attack in Maval Taluka मावळ तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात सहा जण जखमी
Six Injured in Leopard Attack in Maval Taluka मावळ तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात सहा जण जखमी
मावळ तालुक्यातील आंबेगांव पवना नगर येथे आज बिबट्याच्या हल्ल्यात सहा जण जखमी झाले. या घटनेतील बिबट्या आंबेगांव पवना नगरमधील एक कॅम्प साइट येथील एका झाडावर बसलेला होता. स्थानिक वन्यजीव रक्षक शत्रुगन राकर यांनी याची माहिती मिळाल्यावर तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
बिबट्याच्या चाहूल लागणल्याने कुत्र्याचा आवाज ऐकून बिबट्या खाली उतरला आणि त्याने एका कुत्र्यावर हल्ला केला. हल्ल्यात कुत्र्याच्या मालकाने हस्तक्षेप केला, त्यानंतर बिबट्याने मालकाचाही चावा घेतला.प्रसंगी अन्य गावकरी ही प्रसंगावधान दाखवत मदतीला धाउन आले. परंतु, त्या दरम्यान बिबट्याने सहा जणांना चावा घेत जखमी केले. या जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर बिबट्याची रेस्क्यू चैरिटेबल ट्रस्ट पुणे येथे रवानगी करण्यात आली आहे.
याआधी २ फेब्रुवारी रोजी निगडी प्राधिकरण क्षेत्रात बिबट्याचे दर्शन घडले होते. याआधी २००८ मध्ये बिबट्या पुणे शहरात सापडला होता. या घटनेमुळे पुणे आणि मावळ तालुक्यातील नागरिकांमध्ये मोठी भीती पसरली आहे.