Thieves Snatch Gold Chains in Wakad Arrested by Police वाकडमध्ये चोरट्यांनी सोनसाखळ्या हिसकावल्या पोलिसांनी अटक केली

वाकड परिसरात दोन चोरट्यांनी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करणे तसेच व्यवसायातील झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी सोनसाखळ्या हिसकावल्याची घटना घडली. दोघांनी सायंकाळी एका दुचाकीवरून येऊन दोन महिलांच्या गळ्यातील सुमारे ४ तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले.
पोलिसांना ८ फेब्रुवारी रोजी दुचाकीच्या संशयितांसंदर्भात माहिती मिळाली आणि त्यानुसार वाकड पोलिसांनी सापळा लावून त्यांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये हिफाजत अली इनाम अली अन्सारी (वय २४, रा. पिंपळे गुरव) आणि समीर फिरोज अन्सारी (वय २०, रा. पिंपळे गुरव) यांचा समावेश आहे.
दोघेही मूळचे उत्तर प्रदेशातील बिजनौ जिल्ह्यातील नगीना गावचे रहिवासी आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून तीन लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.