128th Death Anniversary of Rao Bahadur Narayan Meghaji Lokhande; Pledge for Workers’ Rights Struggle रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या १२८ वी पुण्यतिथी; कामगार हक्कांसाठी संघर्षाची शपथ

128th Death Anniversary of Rao Bahadur Narayan Meghaji Lokhande; Pledge for Workers' Rights Struggle रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या १२८ वी पुण्यतिथी; कामगार हक्कांसाठी संघर्षाची शपथ
पिंपरी, sसत्यशोधक व भारतीय कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या १२८ वी पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश इंटक अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांचे योगदान आणि कामगार चळवळीतील भूमिका कधीही न विसरण्याचे महत्त्व सांगितले.
डॉ. कैलास कदम म्हणाले की, त्या काळात उद्योग नवे होते, शोषण नव्हते, आणि कामाचे नियमही अस्तित्वात नव्हते. महिलांसाठी कोणतीही सोय नव्हती आणि कामगारांचा शोषण आर्थिक आणि जातीय दृष्टीकोनातूनही होत होता. अशा परिस्थितीत, रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी महात्मा फुलेंच्या विचारांच्या आधारावर भारतीय कामगार चळवळीची सुरूवात केली.
लोखंडेंनी कामगारांचे कामाचे तास निश्चित केले, श्रमाचे योग्य मुल्य दिले, आणि कामगारांसाठी साप्ताहिक आणि हक्काची सुटी मिळवून दिली. महिला कामगारांच्या शोषणावर आणि कामगारांच्या आपसातील स्पृश्यास्पृश्य भावनेवर त्यांनी आळा घातला. त्यांच्या संघर्षामुळे कामगारांच्या हक्कांची मागणी आणि आंदोलन कसे करावेत, याची दिशा सापडली.
तथापि, आज केंद्र सरकारने कामगार कायद्यांत बदल करून भांडवलदारांच्या फायद्यासाठी चार कामगार संहित कायद्यांची अंमलबजावणी केली आहे. यावरून डॉ. कैलास कदम यांनी आशंका व्यक्त केली आणि कामगार कायदे मागे घेण्यासाठी एकजूट होण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमात हिंद कामगार संघटनेचे यशवंत सुपेकर, शांताराम कदम, सचिन कदम, कामगार प्रतिनिधी किरण भुजबळ, विकास साखरे, सोपान बरब्दे, कुणाल ललवाणी, संतोष पवार, विजय मोकळे, तानाजी लोखंडे, विठ्ठल गुंडाळ, राजू मोहिते, सुरेश तरडे, जगन्नाथ हडप, शेखर मांढरे, संतोष खेडकर इतर प्रमुख कामगार नेत्यांची उपस्थिती होती.