Weekly Cleanliness Drive Under Swachh Bharat Abhiyan Conducted स्वच्छ भारत अभियानांतर्गत साप्ताहिक स्वच्छता मोहीम राबवली

Weekly Cleanliness Drive Under Swachh Bharat Abhiyan Conducted स्वच्छ भारत अभियानांतर्गत साप्ताहिक स्वच्छता मोहीम राबवली
स्वच्छ भारत अभियानाच्या अंर्तगत महापालिकेच्या वतीने आठही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रत्येक शनिवारी सकाळी ८ ते १० या वेळेत साप्ताहिक स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत धार्मिक आणि आध्यात्मिक स्थळे, पर्यटनस्थळे, सार्वजनिक शौचालये, भाजी मंडई, मुख्य चौक, स्मारक उद्यान, महापुरुषांचे पुतळे आणि याच परिसरातील २०० मीटरपर्यंतचा रस्ता स्वच्छ केला जात आहे.
शनिवारी, ३१ जानेवारी रोजी, संभाजीनगर येथील बर्ड व्हॅली उद्यान, आकुर्डी चौक येथील खंडोबा मंदिर परिसर, भक्ती-शक्ती ते दुर्गा देवी टेकडी, लिंक रोड येथील स्वामी समर्थ मठ, रावेत येथील इस्कॉन मंदिर परिसर, बिजलीनगर येथील शाहू गार्डनजवळील संत विश्वेश्वर मंदिर, आणि चिंचवडगाव येथील जिजाऊ पर्यटन केंद्र यांसारख्या प्रमुख स्थळांची स्वच्छता करण्यात आली.
या मोहिमेतील स्वच्छता कार्यात उपायुक्त सचिन पवार, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, सहायक आरोग्य अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता दूत, नागरिक, विद्यार्थी, सेवाभावी संस्था आणि महिला बचत गट यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.