उद्धव ठाकरे यांची दिग्रस सभा


दिग्रस: सध्याच्या तापलेल्या राजकीय वातावरण आणि येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमी वरती उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा आखला आहे. महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात विदर्भातील दिग्रस या आमदार संजय राठोड यांच्या मतदारसंघातून केली आहे. दिग्रस येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी सध्याच्या सरकारवर सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांची दिग्रस सभा
सबका मालिक एक
मिंधे गट म्हणतात शिवसेना माझीच काल परवा जे राष्ट्रवादीतले गेले ते म्हणतात राष्ट्रवादी माझीच. पण त्यांचा मालिक एक आहे. सबका मालिक एक. या सगळ्या राजकीय पक्षांचा मालक एक. सबका मालिक एक. म्हणत नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली
शेतकऱ्यांच्या वीज पंपाचे बिल माफ केलं पाहिजे
उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना त्याना देवेंद्र फडणवीस यांची क्लिप ऐकवली होती. ते मध्य प्रदेश मध्ये जाऊन म्हणाले होते मध्यप्रदेश सरकार प्रमाणे महाराष्ट्रसरकानेही शेतकऱ्यांच्या वीज पंपाचे बिल माफ केलं पाहिजे. आता देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आहे व केंद्रातही तुमचं सरकार आहे. तुम्हीं असं आता महाराष्ट्रात कराव. हे सरकार एवढे मजबूत आहे केंद्रात सुद्धा तुमच्या सरकार आहे तर तुम्ही शेतकऱ्यांचे बिल का माफ करत नाहीये.
एक फुल दोन हाफ
यावर बोलताना ठाकरे म्हणाले आज तुम्ही सरकारमध्ये एक फुल दोन हाफ आहात मुख्यमंत्री अर्धा की एक पूर्ण आहे याची कल्पना नाही. दोन-दोन उपमुख्यमंत्री आहेत.आमच्या तिघांचं सरकार होतं ते तीन चाकांचा सरकार होतं. त्यांचं झालं की लगेच त्रिशूल झालं.आणखीन उद्या कोणाला आणखीन काही होणार आहे कल्पना नाही.
पूर्वी सरकार मतदान पेटीतून जन्माला यायचं आता खोक्यातून जन्माला येतं
आता असं झालेला आहे तुम्ही मत कोणालाही द्या पण सरकार माझंच येणार पूर्वी सरकार मतदान पेटीतून जन्माला यायचं आता खोक्यातून जन्माला येतं. खोके गेली की सरकार आलं. आता समान नागरिक कायद्याची चर्चा सुरू झाली आहे.
पण एक देश आणि एक पक्ष हे आम्ही कदापि मान्य करणार नाही.
एक देश आणि एक कायदा आम्हाला मान्य आहे. पण एक देश आणि एक पक्ष हे आम्ही कदापि मान्य करणार नाही. अजिबात करणार नाही.