उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौरा

उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौरा
उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौरा
उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौरा

दिग्रस: त्यांच्या दौऱ्याची सुरुवात आज विदर्भ दौऱ्याने होत आहे.विदर्भामध्ये पक्ष संघटना अजून मजबूत करण्यासाठी हा दौरा आखला आहे. उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज पहिल्या टप्प्यामध्ये ते यवतमाळ येथे असून त्यांनी पोहरादेवीचे दर्शन घेत दौऱ्याला सुरावात केली. उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौरा…

ते संजय राठोड यांचा बालेकिल्ला असणाऱ्या दिग्रस महेश कृषी उत्पन्न बाजार समितीत सभा घेतली. त्याआधी ते यवतमाळ आणि वाशिम च्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. दिग्रज च्या सभेनंतर उद्धव ठाकरे अमरावतीला जाणार आहेत.

दरम्यान बंजारा समाजाची काशी असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथून उद्धव ठाकरे यांच्या दौऱयाची सुरुवात होत आहे. पक्षात पडलेल्या उभ्या फुटीनंतर आणि मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच पोहरादेवी येथे येत आहेत.आमदार संजय राठोड आणि खासदार भावना गवळी यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे आज भेट घेणार आहेत. राज्यामध्ये बंजारा समाजाची असलेली मतदार संख्या आणि बंजारा समाजात पोहरादेवीच्या असलेल्या अनन्य साधारण महत्त्वामुळे उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाला आहे. आज दोन वाजता उद्धव ठाकरे पोहरादेवी येथे पोहोचतील तिथे दर्शन घेतल्यानंतर ते बंजारा समाजाच्या धर्मगुरूंना भेटतील.

श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे आज बंजारा समाजातर्फे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे ह्यांचा सत्कार करण्यात आला. ह्यावेळी स्वाभिमानाची निशाणी म्हणून चांदीचा कडा देऊन स्थानिकांनी प्रेम व्यक्त केले.