पुनश्च राजकीय भूकंप
अजित पवार उपमुख्यमंत्री किंवा अर्थमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात आहे. अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या ५४ पैकी २५ ते ३० आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगण्यात येत आहे. अजित पवारांबरोबर छगन भुजबळ आणि एकूण ९ आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. अजित पवार दुपारी २ च्या दरम्यान राजभवनाकडे खासगी वाहनाने रवाना झाले. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे मंत्रिमंडळाचे जवळ जवळ सर्व आमदार राजभवनाकडे रवाना झाले आहेत.
नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस च्या वर्धापन दिनाच्या भाषणात अजित पवार यांनी मला विरोधी पक्षनेत्यांच्या जबाबदारीतून मुक्त करून पक्ष संघटनेची जबाबदारी द्या असे अप्रत्रत्यक्षरित्या म्हणाले होते. परंतु राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची सूत्रे सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या कडे देण्यात येणार होते. यावर अजित पवार यांनी १ जुलै ला अल्टिमेटम दिला होता अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. ६ जुलै ला राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार होती पण त्याअगोदरच आज अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर देवगिरी या निवासस्थानी बैठक घेत भाजप आणि शिवसेना महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला
बैठकीला खालील नेते उपस्थित होते.
दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, किरण लहमाटे, निलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दौलत दरोडा, मकरंद पाटील, अतुल बेणके, सुनिल टिंगरे, अमोल मिटकरी, आदिती तटकरे, शेखर निकम, निलय नाईक, अशोक पवार, अनिल पाटील, सरोज अहिरे