रोहित पवार vs छगन भुजबळ
आज रोहित पवार vs छगन भुजबळ पाहूया काय म्हणाले हे दिग्गज नेते.
राष्ट्रवादी पक्षात झालेल्या राजकीय फुटीनंतर राष्ट्रवादीमध्ये अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले आहेत.
दोन्ही गटांनी एकमेकांविषयी विरोधात रणशिंग फुंकले आहे.
राष्ट्रवादीचे कर्जत मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटावर सडकून टीका केली आहे.
त्या टिकेला अजित पवार गटाच्या नाशिक मधील येवला मतदार संघाचे फायबरब्रँड आमदार छगन भुजबळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले रोहित पवार
मध्ये काही बॅनर वरती मी पोस्टर पाहिले त्यामध्ये अजितदादांचा फोटो सुद्धा नव्हता पोस्टरवर दुर्दैवाने अजित दादांचा फोटो सुद्धा नव्हता.
ह्या ज्या गोष्टी चाललेल्या आहेत त्याबद्दल मला असं वाटतंय अजित दादा यांना काही चार पाच लोक हे व्हिलन करत आहेत.
दादा हे मोठे नेते आहेत. त्यांनी हा जो निर्णय घेतलेला आहे तो आम्हालाही पटलेला नाही. लोकांनाही पटलेला नाही.
पण हे जे राजकारण चालू आहे बीजेपी एसी मध्ये राहून मजा पाहत आहे. आम्ही आमच्यात भांडत आहोत.
आणि लोकांना हे माहिती आहे कुटुंब कोणी फोडलं पार्टी कोणी इथून पडली फोडली.
प्रत्युत्तरात काय म्हणाले छगन भुजबळ
रोहित पवार यांना सांगा मी जानेवारी फेब्रुवारी 1985 ला आमदार झालो. एप्रिल 1985 ला मुंबईचा महापौर झालो. त्याच्यानंतर चार महिन्यांनी तुमचा जन्म झाला. त्यामुळे मला मोठा केलं… मला मोठे केलं… या फालतू गोष्टी करू नका.
इतिहास जाणून घ्या. उगीच जास्त काही त्याला मी किंमत देत नाही. ते जेवढे पुढे येतील तेवढं मी त्यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांना उत्तर देईल.
प्रत्युत्तरात काय म्हणाले रोहित पवार
मला किंमत देऊ नका ते मोठे नेते आहेत. त्यांचा संघर्ष माझ्यापेक्षा खूप मोठा आहे. जशी आज 37 वर्षाची माझी भूमिका आहे.
या वयामध्ये तशीच जर मी साठीला असतो आणि पद मी घेतले असते तर हीच आजची भूमिका मी तिथं घेतली असती.
खोत जेव्हा पवार साहेबांच्या विरोधात बोलतात…
आज हे नेते बीजेपी बरोबर असले तरी आज त्या नेत्यापैकी कोणी ठोस भूमिका घेतली पवार साहेबांच्या बाजूने. या खोताच्या विरोधात का कोणी भूमिका घेतली नाही.
का विसरला तुम्ही 40 वर्ष का विसरला. तुम्ही 35 वर्ष तुम्ही माझ्या मतदारसंघात या सभा घ्या मला पाडण्याचा प्रयत्न करा.